EnRead Library च्या नवीन ठिकाणी उद्घाटन सोहळा काल पार पडला. अभिनेत्री सोबत सामाजिक जाण असलेल्या @geetanjalikulkarni यांच्या हस्ते सोहळा संपन्न झाल्याने आनंद गगनात मावेना. कार्यक्रमात सहभागी १५० मंडळी, म्हणजेच सजगचे हितचिंतक, भागीदार जे खूप काळ सजग सोबत आहेत. सगळे या आनंदी सोहळ्यात सहभागी झाले यासारखी अभिमानाची गोष्ट नाही.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सजगच्या पुस्तकाचे पान बदलून नवीन पर्वाची सुरुवात झाली. त्यानंतर गीतांजली ताईंच स्वागत व अध्यक्ष किरण लिमये यांनी मनोगत व्यक्त करताना, ''माहिती व संधीचा अभाव दूर करणे हे सजगच्या अभियाना बद्दल सांगितले. तसेच मुलांना वाचनाची गोडी लागून त्यानिमित्त सगळे जोडले जातील असेही त्यांनी सांगितले."
त्यानंतर गीतांजली ताईंनी मुलांसाठी नाट्यमय प्रकारे पुस्तकाचं वाचन करून अशाप्रकारे वाचन केल्याचे काय फायदे होतील त्यावर चर्चा केली. तसेच अशाप्रकारच्या active reading space ची गरज आणि महत्व पटवून दिले. ' गुल्लक' सिरीजचे चाहतेही उपस्थित असल्याने वाचानासोबतच त्याच्या अभिनय क्षेत्रातील अनुभव मांडले.
या छोट्याशा अनौपचारिक मुलाखती नंतर उपस्थित शिक्षक व पालकवर्ग यांनी लायब्ररीचा लाभ कसा घेतला, त्यांना काय फायदा झाला ते व्यक्त केले.
Active space करण्यासाठी तुमची साथ अशीच कायम राहुदेत.
SAJAG व
EnRead ची माहिती जाणून घेण्यासाठी दोन्ही page like करा व follow करा.